वरोरा येथे विशेष लोक अदालतीमध्ये 1 कोटी 54 लक्ष रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा

वरोरा येथे विशेष लोक अदालतीमध्ये 1 कोटी 54 लक्ष रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा

चंद्रपूर, दि. 8 : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश-1 प्रविण अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा येथील न्यायालयात विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.

सदर विशेष लोक अदालतीमध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निलेश सरोसिया हे पॅनल प्रमुख होते. सदर पॅनलवर भूसंपादनाची 38 ,मोटर वाहन अपघात नुकसान भरपाईची 2 तर कौटुंबिक वादाची 7 अशी एकूण 47 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी भूसंपादनाची 27 प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाईची 1 कोटी 54 लक्ष 90 हजार 578 रुपये रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित  जोशी यांनी दिली.