चंद्रपूर : जी.प. ऊ. प्राथ.शाळा लाडबोरी मध्ये मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. कलाम यांना आंदरांजली

जी.प. ऊ. प्राथ.शाळा लाडबोरी मध्ये मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. कलाम यांना आंदरांजली

लाडबोरी:
मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लाडबोरी येथे सरांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी.येथे आज दि.27 जुलै 2021ला मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. कैलासजी कामडी.तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक. तथा विषय शिक्षक श्री जांभूळकर सर, विषय शिक्षिका कु.
वसाके मॅडम , कु. ठाकरे मॅडम . सहाय्यक शिक्षिका.लाडबोरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

जी.प. ऊ. प्राथ.शाळा शिक्षक वृंद यांचा कडून सांची सुनिल गेडाम ह्या विद्यार्थिनीचा वाढदिवस साजरा

आज दिनांक 27 जुलै 2021 ला इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेली. कु सांची सुनिल गेडाम मु. लाडबोरी. या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचे भावी स्वप्न सांची पूर्ण करेल हीच कलाम सरांना श्रद्धांजली दिली.तसेच जिल्हा परिषद मधील शिक्षक वृद शाळे मध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून अभ्यासाची विद्यार्थ्या वर्ग कडे आवड निर्माण करण्यासाठी असेच उपक्रम करीत असतात.शालेय दिवसात वाढदिवस असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस शाळे मध्ये साजरा करीत असतात.