पंडित, दीनदयाळ उपाध्याय यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्य केले : राहुल पावडे

पंडित, दीनदयाळ उपाध्याय यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्य केले : राहुल पावडे

पं. दीनदयाळ उपाध्याय यांची १०७ जयंती साजरी

चंद्रपूर :- अंत्योदयाचे प्रणेते, तत्त्वचिंतक पं. दिनदयाळ उपाध्याय यांच्या १०७ व्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना राहुल पावडे म्हणाले की, पं. दीनदयाळजींना अंत्योदयाचे प्रणेते मानले जाते. त्यांनी जगासमोर एकात्म मानववादाचा सिद्धांत मांडला. समाजातील शेवटच्या घटकाच्या जिवनात आनंद निर्माण झाला पाहिजे आणि दुर्लक्षित घटक समाजाच्या प्रगत प्रवाहात आला पाहिजे, यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्य केले. पंडितजींचा अंत्योदयाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने नानाविध योजना व कार्यक्रम हाती घेतले आहेत. “अंत्योदयापासून सर्वोदयापर्यंत” या मुलतत्वावरचं “सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास” चे तत्व आधारभूत आहे. सर्वार्थाने दरीद्रीनारायणाचे कल्याण व्हावे आणि देश उन्नतीच्या दिशेने मार्गस्थ व्हावा, यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आवास योजना, उज्ज्वला गॅस, जन-धन खाते इ. अशा अनेक योजनांच्या माध्यमातून अंत्योदयाच्या कल्याणासाठी मोदी सरकार प्रयत्नरत आहे.  विकास हा सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. या कार्यक्रमाला मनिषा महातव , सचिन बोबडे , अमोल मते, व वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.