संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

 

भंडारा दि.27: संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ कार्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 149 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजना प्रसंगी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करुन सामाजिक न्याय दिनाचे उद्घाटन करण्यात आले.

 

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ.मंगेश वानखेडे, प्रमुख्य अतिथी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प मनिषा कुरसूंगे, प्रमुख उपस्थिती सहा.आयुक्त, समाज कल्याण बाबासाहेब देशमुख, जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग महा. कल्पना भंगारे उपस्थित होते.

 

यावेळी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधुन संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ विभागाच्या लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी धनादेशाचे वितरण करण्यात आले.