चंद्रपूर : मटण मार्केटमध्ये सतूरने केले जखमी

मटण मार्केटमध्ये सतूरने केले जखमी

प्रतिनिधी :- गौरव मेले , वरोरा

वरोरा:-
वरोरा शहरातील यात्रा वार्ड येथील महेश अमृतराव तूमाने वय 52 यास आरोपी मुलगा आकाश अशोक हिकरे व आई इंदिरा अशोक हिकरे यानी पकडून सतूरने मारून गंभीर जखमी केले, ही घटना काल दि 1 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली.
सकाळच्या सुमारास कोंबडा तू इथे कापू नको म्हणून वाद निर्माण झाला काही वेळातच आरोपीने महेश ला सतूरने जखमी केले, जखमी अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले, पोलिसांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले ,आरोपी आकाश हिकरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्यावर अनेक गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला आहे,याचे राजनैतिक संबंध असल्यामुळे , यावर शहरातील काही राजकीय नेत्यांचा हात असल्यामुळे वारंवार यांनी केलेले गुन्हे हे नेते लोक दाबण्याचा प्रकार करीत असून यांची गुन्हेगारी वाढत आहे असा आरोप जखमीने केला आहे.