सोमवारी शेतकरी उत्पादक कंपनी व खरेदी विक्रेते यांची कार्यशाळा

सोमवारी शेतकरी उत्पादक कंपनी व खरेदी विक्रेते यांची कार्यशाळा

        भंडारा,  दि.23 : जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत उत्पादित केलेले धान्य/भाजीपाला इ. करीता कृषि उत्पादने खरेदी व विक्रेता कार्यशाळा  सोमवार दि. 25 सप्टेंबर 2023 ला सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी, योगेश कुंभेजकर  यांच्या अध्यक्षतेखाली, नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परीसर,  येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

         या कार्यशाळेस श्री. रविकिरण पाटील, कृषि समृध्दी शेतकरी उत्पादक कंपनी, श्री.प्रविण वानखेडे, युनिवर्सल, निर्यातादार, श्री. प्रफुल बांडेबुच्चे अध्यक्ष मैत्रेय फार्मर प्रोडुसर कंपनी व श्री.तुषार वरनकर, घरकुल मसाले उत्पादक व श्री.जयंत मावडे, खरेदीदार पुणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

        सदर कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपनी चे रबी 2023 चे नियोजनाबाबत सुद्धा चर्चा करावयाची आहे. विक्रेता व खरेदीदार यांच्यात सुसंवाद घडवुन खरेदीदारास आवश्यक उत्पादनाचे नियोजन करावयाचे आहे. करीता जिल्ह्यातील विक्रेता व खरेदीदार, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी चे सदस्य  तसेच उमेद व माविमचे चे शेतकरी उत्पादक कंपनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगीता माने , यांनी आवाहन केले आहे.