हरकती किंवा सूचना असल्यास नोंदवावे -उपजिल्हा निवडणूक अधिकारी

प्रारूप मतदान केंद्राच्या यादीवर हरकती किंवा सूचना असल्यास नोंदवावे -उपजिल्हा निवडणूक अधिकारी

 

         भंडारा, दि.२३ : भारत निवडणूक आयोगाने दिनांक २९ मेच्या पत्रातील निर्देशान्वये जाहिर केलेल्या पुनरिक्षण पुर्व कार्यक्रमांतर्गत, भंडारा जिल्हयातील ६०-तुमसर, ६१-भंडारा, ६२-साकोली विधानसभा संघाच्या मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण व प्रमाणिकरण करुन प्रारुप मतदान केंद्र यादी दि.२१ सप्टेंबर रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही यादी https://bhandara.gov.in  या संकेतस्थळावर देखील पहाण्यास उपलब्ध आहे.

       या यादी संदर्भात  नागरिकांना तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना  हरकती व सुचना नोंदवायच्या असल्यास त्यांनी २९ सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा (निवडणूक शाखा) या ठिकाणी नोंदवाव्यात. त्या स्विकारण्यात येतील. ही प्रारुप मतदान केंद्र यादी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी कळवले आहे.