गणेश महोत्सव सोहळा दरम्यान एका दिवसात ६८ तकाराचे निवारण

भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित गणेश महोत्सव सोहळा २०२३ दरम्यान एकुण एका दिवसात ६८ तकाराचे निवारण

भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय भंडारा येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. आदर्श गणेश उत्सव मंडळ पोलीस मुख्यालय भंडारा तर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधुन विवीध कार्यक्रमाचे / स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एक भाग म्हणुन दिनांक २५/०९/२०२३ रोजी सकाळी १० ते १४ वाजे पर्यंत पोलीस बहुउद्देशीय सभागृह येथे पोलीस अधीक्षक भंडारा मा. श्री लोहित मतानी यांचे अध्यक्षतेखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा डॉ. अशोक बागुल यांचे उपस्थितीत तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये अर्जदार, गैरअर्जदार है हजर येवुन त्यांचे तक्रारी ऐकुन तकार निवारण कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी भंडारा उपविभागातील पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार, अर्जदार व गैरअर्जदार यांचे समक्ष एकुण ६८ निकाली काढण्यात आले.