प्लॉस्टिक व्यवस्थापन काळाची गरज – नुतन सावंत स्वच्छता ही सेवा मोहीम

प्लॉस्टिक व्यवस्थापन काळाची गरज – नुतन सावंत

स्वच्छता ही सेवा मोहीम

 

चंद्रपुर दिनांक – 20/09/2023 वाढता प्लॅस्टिक वापर हे पर्यावरणाला घातक असुन, प्रत्येक गावात प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. वापर करण्यात आलेल्या प्लॅस्टिकचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन होणे  काळाची गरज आहे. असे मत  जिल्हा परिषद च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नुतन सावंत यांनी व्यक्त केले.

देशात मोठ्या उत्साहात स्वच्छता ही सेवा मोहिम 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधित राबविण्यात येत असुन, या अंतर्गत शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी या अंतर्गत विविध उपक्रम दररोज राबविल्या जात आहे. प्लॉस्टीक व्यवस्थापनावर सुध्दा भर दिल्या गेल्या असुन, या बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे.  या साठी स्वच्छता ही सेवा मोहीमे अंतर्गत कुटुंब भेट उपक्रम जिल्ह्यात राबविल्या जात असुन, गावातील कुटुंबांना भेटी देवुन, कचरा वर्गिकरन, प्लॉस्टिक संकलन व त्याचे व्यवस्थापन या बाबत महत्व पटवुन दिल्या जात आहे. घरगुतीस्तरावरील कच-यामध्ये ओला कचरा सुखा कचरा हा कुटुंब स्तरावर कसा वर्गिकरण करता येतो . यासाठी कुटुंबस्तरावर दोन कचरा कुड्यांचा वापर केला पाहीजे. कुटुंब स्तरावर कचरा वर्गिकरण झाले तर गावात वर्गिकृत कच-याचे व्यवस्थापन करण्यास सोपे जाते. उघड्यावर कचरा दिसणार नाही. अशा साध्या सोप्या उपाय योजना घेवुन , गावातील कुटुंबांना भेटी देवुन जनजागृती केल्या जात आहे. या उपक्रमात गावस्तरावर आशावर्कर, अंगणवाडी सेविका, सिआरपी कार्यकर्ता, ग्रामसेवक महत्वाची भुमिका पार पाडत आहे.  याशिवाय जिल्हा ,तालुका स्तरावरील अधिकारी ,कर्मचारी या उपक्रमात सहभागी होत आहे. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधित चालणा-या स्वच्छता ही सेवा मोहीमेतील प्रत्येक उपक्रमात गावस्तरावर ग्रामस्थांनी सहभागी व्हावे.  असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नुतन सावंत यांनी केले आहे.

           कुटुंबस्तरावर कचरा वर्गिकरण करणे ही शाश्वत स्वच्छतेच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल असुन, यामुळे गावस्तरावरील कचरा व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. या सोबतच प्लॉस्टीकचा कमीत कमी वापर व प्लॉस्टीक वापरावरच बंदी कशी करता येईल याबाबत ग्रामस्थांनी जागृत व्हावे. स्वच्छता ही सेवेच्या प्रत्येक उपक्रमाला प्राधान्य द्यावे.

–  विवेक जॉनसन,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपुर.