सिंदेवाही नगरीत सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न

सिंदेवाही नगरीत सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न

अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा चंद्रपूर चे वरिष्ठ मार्गदर्शक नकटुजी मंगरुजी सोनुले यांची मुलगी चि.सौ.का. मोहिनी हिचा चि. गणेश सौ. कुंदा श्री नामदेव सखाराम शेंन्डे रा. राजुरा जि. चंद्रपूर यांचा सत्यशोधक विवाह सोहळा थाटात पार पडला.
अखिल भारतीय माळी महासंघ ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय प्राध्यापक नामदेवराव जेंगठे आणि माननीय अशोक शेंडे सर यांनी सत्यशोधक सोहळा पार पाडला यावेळी कुठलेही कर्मकांडं न करता जा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याच्या अक्षता न करता फुलांचा वर्षाव वधू-वरांवर करून सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी वधू-वरांनी मानवपंचांच्या साक्षीने एकमेकांच्या साथीने वैवाहिक जीवन सुरू करण्याची शपथ वधू आणि वर यांनी घेतली. तसेच वधू-वरांचे माता पितांनी एकमेकांना ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
सत्यशोधक मंगलाष्टके विजय गुरनुले यांनी म्हटली, सत्यशोधक मंगलाष्टके वधू-वरांच्या शपथे नंतर विद्या दानाचा चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वधूपिता नकटुजी सोनुले यांनी 25 हजार रुपयांची पुस्तके समाजाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले अभ्यासिका/ वाचनालय याकरिता दान केली त्याच वेळी अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा चंद्रपूर च्या वतीने रुपये पाच हजाराचे पुस्तके विद्यार्थ्यांना भेट करण्यात आली.
या सत्यशोधक विवाह कार्यक्रम प्रसंगी माजी चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनले, ओबीसी क्रांति दलाचे अध्यक्ष एडोव्होकेट राजेंद्र महाडोरे, माळी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस शिवराम गुरनुले, अखिल भारतीय माळी महासंघाचे मार्गदर्शक प्राध्यापक नामदेवराव जेंगठे सर, प्राचार्य डॉ. कोकोडे सर, मुंबईचे विक्रीकर उपायुक्त तथा विशेष कार्य अधिकारी मंत्रालय, मुंबई किरण गावतुरे सर , डॉ. राकेश गावतुरे ,जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन भेदे, प्रा. माधव गुरनुले ,प्रा सुरेश लोनबले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष विजय लोनबले, संघटक एडव्होकेट प्रशांत सोनुले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकलाताई गावतुरे,दीपकपाटील वाढई, प्रा अनिल लोनबले, इंजिनीयर नितीन लोनबले, इंजिनिअर अनिल गुरनुले, महिला कार्यकर्त्या सीमाताई लोनबले,दिलीप मोहुर्ले, ईश्वर लोनबले, नंदू बारस्कर, सुनिल कावळे, विलास गुरुनुले, प्रा. पवन गुरनुले, सुधिर ठाकरे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.