अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्राची त्रुटीपूर्तता करावी

अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्राची त्रुटीपूर्तता करावी

Ø 12 व 13 जुलै रोजी त्रुटीपूर्ततेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 07 : सन 2023 मध्ये ज्या अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज सादर केले आहे त्या अर्जदारांचे दि. 28 जून 2023 पर्यंत संपूर्ण प्रकरणे तपासण्यात आली आहे. ज्या प्रकरणांमध्ये अपूर्ण दस्तऐवजाअभावी त्रुटी आलेल्या आहेत अशा प्रकरणांमध्ये अर्जदारांना ई-मेल पाठविण्यात आले आहे. तथापि, माहे 28 जून 2023 अखेर ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांनी त्रुटी पुर्ततेकरीता दि. 12 व 13 जुलै 2023 रोजी संपूर्ण दस्तऐवजासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उपस्थित राहुन त्रुटीची पूर्तता करून घ्यावी.

 

जेणेकरून, अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील. यास समिती जबाबदार राहणार नाही, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी, असे समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.