“१३८ किलो गांजा एकुण २०,९८,८००/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद”

“१३८ किलो गांजा एकुण २०,९८,८००/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद”

गडचिरोली जिल्हयात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे / उप-पोस्टे / पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.

काल दि.१०/०९/२०२३ रोजी सपोनि मिथुन सिरसाट, पोलीस मदत केंद्र मुरुमगाव यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, ०३ अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-०४-सीएम-२५१५ मध्ये गांजा हे मादक पदार्थ बाळगुन छत्तीसगड राज्यातुन सावरगाव – मुरुमगाव मार्गे गडचिरोलीकडे येत आहेत. त्यावरुन मुरमगाव ता.धानोरा, जि गडचिरोली येथील कटेझरी जाणारा रोड समोरील बस स्थानकासमोर सापळा लावुन सदर कारला हात दाखवुन थांबवुन तपासणी केली असता कारमध्ये पिवळया रंगाची चुंगळी, सिल्वर रंगाची चुंगळी, पांढऱ्या रंगाची चुंगळी असे ०३ चुंगळ्यामध्ये एकुण १३८ किलो ५८० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत १३,८५,८००/- रु. ( तेरा लक्ष पंच्याऐंशी हजार आठशे रु.) मिळुन आल्याने सदर गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन सिल्वर रंगाची होंडा सीटी कार क्र. एमएच ०४ – सीएम २५१५ किंमत ७,००००० /- (सात लक्ष रु.) तसेच दोन आरोपीकडे मिळालेल्या मोबाईलची किंमत १३,०००/- ( तेरा हजार रु.) असे एकुण किंमत २०,९८,८००/- ( वीस लक्ष अठ्ठयान्नव हजार आठशे रु.) रुपयेचा मुद्देमाल पोलीस मदत केंद्र मुरुमगाव येथे आणुन आरोपी नामे १) उमर फैय्याज अहमद शेख, वय २८ वर्ष, व्यवसाय वाहन चालक, रा. कमला रमननगर बेंगनवाडी जवळ रजा चौक गोपाल इलेक्ट्रेशन गोवंडी मुंबई – ४३, २) राकेश राजु वरपेटी, वय २६ वर्ष, व्यवसाय – मजुरी, रा. सिध्दार्थ रहिवासी सेवासंघ, टाटानगर, शिवाजीनगर एसओ मुंबई – ४३, ३) शहबाज सरवर खान, वय-२७ वर्ष, व्यवसाय – वाहन चालक, रा. बिहॉयंन्डीग बिल्डींग नंबर- ५३ जवळ आचार्य कॉलेज सुभाषनगर चेंबुर मुंबई-७१ यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२३ ते आतापर्यंत एकूण ४१६ किलो ३५९ ग्रॅम अंदाजे ५१,९१,४८०/- रु. किंमतीचा गांजा जप्त करण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोमके मुरुमगावचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन सिरसाट हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा. तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा श्री. मयुर भुजबळ सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र मुरुमगाव अधिकारी सपोनि मिथुन सिरसाट यांचे नेतृत्वात परि पोउपनि राहुल चौधरी, पोहवा – नानाजी पित्तुलवार, पोअंम – दिलीप लंबुवार, पोअंम- तराचंद मोहुर्ले, पोअम-वाल्मीक कोटांगले, पोअंम – विनेश मांढरे, पोअंम – नितीन मडावी तसेचा राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०५ दौंड चे पोहवा वैजीनाथ मदने, पोअंम दिलीप काळे, पोअंम – दिपक जाधव तसेच सीआरपीएफ-११३ बटा. चे पो. नि. मोहनसिंग व त्यांचे सोबत इतर कर्मचारी यांनी पार पाडली.