साकोली तालुक्यात एक हात मदतीचा…

साकोली तालुक्यात एक हात मदतीचा

महसूल सप्ताह अंतर्गत उपक्रम

भंडारा दि. 3: महसूल सप्ताहातअंतर्गत समाजातील वंचित घटक जसे  दुर्गम भागातील बहुरूपी व गोपाळ (भटक्या विमुक्त जाती/जमातीतील) लोकांना मतदानाकरीता प्रवृत्त करणेकरीता,त्यांची मतदार नोंदणी करणेकरीता  साकोली तालुक्यातील मौजा- चारगाव येथे  श्री निलेश कदम,  सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार साकोली  तसेच पर्यवेक्षक तथा तलाठी परसोडी यांनी  भेट देवून भटक्या समाजातील बहुरूपी, गोपाळ समाजाच्या तांडयावर जावून नवमतदाराची नोंदणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बिएलओ)  यांचेमार्फत केली.   तसेच मय्य्त, दुबार, स्थलांतरीत मतदारांची वगळणीचे व दुरूस्तीचे फार्म सदर तांडयातील लोकांकडून भरून जमा करण्यात आले. तसेच भटक्या जमातीतील राशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, याबाबत त्यांच्या अडचणी ऐकून प्रश्न नियमानूसार तात्काळ निकाली निघण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.