रयत शेतकरी संघटने तर्फे एस टी कामगारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

रयत शेतकरी संघटने तर्फे एस टी कामगारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

वरोरा : एस टी कामगारांच्या आंदोलनाला दोन आठवडे पूर्ण होत आली असून राज्य शासनाकडून एस टी कामगारांना दिलासा दायक निर्णय अजून घेतला नाही. यामुळे एस टी कामगार संपावर कायम आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत संप व आंदोलन सुरू आहे. रयत शेतकरी संघटना तालुका वरोरा च्या वतीने एसटी आगार वरोरा येथे सदिच्छा भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन शुभेच्छा व पाठबळ दिले.
वरोरा आगारातील नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सामान्य जनतेच्या प्रवासाची हक्काची लालपरी रस्त्याने कधी धावेल याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. आज अठरा दिवस झाले असून संप सूरु असून जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत संप असाच सुरू राहणार असे एस टी कर्मचारी यांनी सांगितले . यावेळी रयत शेतकरी संघटनेचे युवक आघाडी विदर्भ प्रमुख गौरव मेले , चंद्रपूर चे युवक आघाडी जिल्हा प्रमुख वैभव मेश्राम , शिवम पेंदोर , हर्षल डोंगरे , संकेत येडमे , अंकुश ठावरी , गौरव पोहनेकर , नयन झाडे आदी उपस्थित होते .