जिल्ह्यात मरणोत्तर 58 नेत्र बुबुळांचे दात्यांनी केले दान नेत्रदानासाठी मृत्युचा दाखला आवश्यक -जिल्हा शल्य  चिकीत्सक

जिल्ह्यात मरणोत्तर 58 नेत्र बुबुळांचे दात्यांनी केले दान नेत्रदानासाठी

मृत्युचा दाखला आवश्यक जिल्हा शल्य  चिकीत्सक

            भंडारा,दि.6 : सध्या  राष्ट्रीय नेत्रदान आठवडा सुरू असून त्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.जिल्हयात 38 वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान राबविण्यात येत आहे.त्यानिमीत्त  आयोजित नेत्रदानाच्या प्रसाराकरीता  रॅलीचे  आयोजन डॉ.दीपचंद सोयाम यांच्या  अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

         नेत्रदान हे  अत्यंत मानवतावादी आणि पवित्र कार्य असून त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजसेवी संस्था आणि व्यक्तींनी यासाठी पूढाकार घेतला पाहीजे ,असे आवाहन डॉ.सोयाम यांनी यावेळी केले.  यावेळी मार्च 2022 ते एप्रिल 2023 या दरम्यान जिल्ह्यात मरणोत्तर 58 नेत्र बुबुळे दात्यांनी दान केल्याचे त्यांनी सांगितले.

          या लोकांना नेत्रदानामुळे परत दृष्टी प्राप्त होऊ शकते तेव्हा मानवतेच्या दृष्टिकोनातून मृत्यूनंतर नेत्रदान करून जास्तीत जास्त वासियांनी नेत्रदृष्टी चळवळीत सहभागी व्हावे ,असे आवाहन डॉ. दीपचंद सोयाम यांनी केले.

नेत्रदान कोण करू शकतो ?

1)  नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येते.

2) 2 वर्षाच्या बालकापासून वृद्धापर्यंत कोणीही नेतेदान करू शकतो

3)  ज्यांना ब्लडप्रेशर डायबेटीस दमा इत्यादी आजार आहे ते देखील नेत्रदान करू शकतात.

4) ज्यांचा चष्मा आहे ते सुद्धा नेतेदान करू शकतात.

5)  नेत्रदानाला कुठल्याही धर्माचा विरोध नाही.

6)  मोतिया बिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती नेतदान करू शकतो.

7)  संसर्गजन्य आजारी असणाऱ्या व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकत नाही.

          आपल्या नातेवाईकाचे डोळे अमर करावयाच्या दृष्टीतून नेत्रदानाकरिता  जिल्हा रुग्णालय येथील नेत्र विभाग येथे संपर्क करावा. नेत्रदान हे मानवतावादी कार्य असल्याकारणाने यामध्ये कुठल्याही पैशाचा व्यवहार होत नाही.  यामध्ये पारदर्शकता ठेवण्याकरिता काही अटी शासनाने घालून दिलेल्या आहेत. नेत्रदान हे मृत्यूनंतरच होते ते जिवंत व्यक्तीचं होऊ शकत नाही .याकरिता मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला असणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ.सोयाम यांनी सांगितले.

         हा मृत्यूचा दाखला डॉक्टरांच्या सहीने असणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा आहे की डॉक्टरांद्वारे सिद्ध करण्यात येते व्यक्तीचा मृत्यू झालेला असून त्याचा वय व वेळ नमूद केलेला असतो. शासकीय नियमानुसार हे कार्य होते.  गरजू व्यक्तींपर्यंत नेत्र पोहोचण्यचे कार्य होत असते. सन 2022 ते 23 मध्ये जिल्हा रुग्णालय  नेत्रदानाचे कार्य 157%  वासियांच्या सहकार्याने झालेले आहे.

         याकरिता  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दीपचंद सोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाघये, डॉ. रेखा धकाते, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. धीरज लांबट,डॉ. दुर्गेश पशीने,  तर चिकित्सा अधिकारी श्रीरंग सुपेकर , अमित ढोमणे , संजय शेंडे ,वाहन चालक कुणाल सोनेकर यांनी अहोरात्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन  बुबुळ व नेत्र संकलनाचे कार्य पार पाडले आहे.