राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावीत…

राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावीत यांची वनवासी कल्याण आश्रम कार्यालयात दिली सदिच्छा भेट

 

नागपुर :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी नागपुर येथील रामनगरातील वनवासी कल्याण आश्रम च्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन कुलगुरु डॉ रामदास आत्राम यांनी सत्कार केला.याप्रसंगी वनवासी कल्याण आश्रम चे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री संजय कुलकर्णी, प्रांत सचीव भास्कर रोकडे,निताताई किटकरु,मनोज गेडाम, प्रांत संघटन मंत्री,रमेश आत्राम,प्रज्योत हेपट,महाराष्ट्र जनजाती सुरक्षा मंच संयोजक विनायक, सुरत्ने,प्रसार प्रचार प्रमुख श्रीमंत सुरपाम आदि उपस्थित होते यावे मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी विदर्भातील आदिवासी बांधवाच्या समस्या जाणुन सरकार प्रत्येक स्तरावर आदिवासी च्या विकासासाठी सोबत असुन आपल्याला काही अडचन भासल्यास माझ्याशी संपर्क साधावा आपली योग्य ति मदत करुन शासन स्तरावरील प्रलंबीत समस्या सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली,यावेळी उपस्थितीताशी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी संवाद साधला, समाजबांधव नी विविध समस्येचे निवेदन सुद्धा यावेळी मंत्री महोदयांनी दिले जनजाती/आदिवासी क्षेत्रात वनवासी कल्याण आश्रमाचे भरीव योगदान आहे असे त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले