शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्य गरजुंना ब्लँकेंट चे वितरण…

शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्य गरजुंना ब्लँकेंट चे वितरण…

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने सिंदेवाही शहरात सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सिंन्देवाही यांच्या तर्फे कोरोना काळानंतर लोकहितार्थ लोककल्याणकारी कामे पक्षाच्या माध्यमातून निरंतर राबविण्यात येत आहेत.

आता थंडीच्या दिवसांची सुरुवात झाली असल्याने शेतातील किंवा बाहेर इतरही कामे करणाऱ्यांसाठी घराबाहेर मजुरांना जावे लागते. त्यासाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर चा उपयोग करावा लागतो. परंतु आजही समाजामध्ये अशी काही परीवार, व्यक्ती असतात कि त्यांना स्वेटर, ब्लेकेट,मोपलर घेवु शकत नाही. कारण फक्त आर्थिक परिस्थिती. याच परिस्थितीचा विचार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गरीब गरजू लोकांना ब्लँकेंट चे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्याने त्यांच्या उदंड आयुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित सिंन्देवाही-लोनवाही शहराचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे शहर अध्यक्ष ईब्राहीम (बबलु) शेख व शहर उपाध्यक्ष वसंत कुळमेथे , नरेश टोंगे, महादेव पाटील,राज कुमार अलोने व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.