” निवृत्त पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे निरोप “

” निवृत्त पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे निरोप “

भंडारा – दिनांक ३१/०८/२०२३ रोजी पोलीस मिटींग हॉल भंडारा येथे पोलीस अधीक्षक भंडारा मा. श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा डॉ. अशोक बागुल यांचे हस्ते सेवानिवृत्त अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल दौलत बहादुरे, सहायक फौजदार पुरुषोत्तम मारोतराव शेंडे, सहायक फौजदार बंडु पुनाजी नंदनवार, पोलीस हवालदार विश्वास रामचंद्र साठवणे, पोलीस हवालदार मेघराज लालाजी मते यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करुण पोलीस दलातील सेवा यशस्वीपणे पुर्ण केल्याबद्दल सन्मान पुर्वक निरोप देण्यात आला. यावेळी सर्व सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मा. पोलीस अधीक्षकांनी सेवा पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. भावी आयुष्य आरोग्यपुर्ण व आनंदी होण्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. अशोक बागुल यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व उपस्थित अधीकारी तसेच कर्मचारी यांना मौलाचे मार्गदर्शन केले.