किटकनाशके फवारणी करताना घ्या काळजी

किटकनाशके फवारणी करताना घ्या काळजी

कृषी विभाग करणार जनजागृती

       भंडारा,दि.29: शेतकऱ्यांनी किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा होवू नये यासाठी कृषी विभागाने ग्रामपातळीवर जनजागृती करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी दिले त्यांच्या अध्यक्षतेखाली  कृषी विभागाची बैठक पार पडली .

          यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, समीर कुर्तकोटी, जिल्हा परिषद,व शिक्षणाधिकारी माध्यमिक एस. व्हि. डोर्लीकर, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी प्राथमिक, रविंद्र सोनटक्के,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, श्रीमती. संगीता माने, कृषी अधिकारी, व्हि. जे. पाडवी, जिल्हा परिषद,सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक सोनवने उपस्थित होते. तसेच कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शेतकरी बांधवांनी किटकनाशके फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी

          फवारणी करताना वेगळा स्वातंत्र फवारणी पंप वापरावा,तसेच साधनातील औषधी पूर्णपणे निघून गेले आहे यांची खात्री करावी,तसेच वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी,व किटकनाशकांचे रिकामे डबे नष्ट करावे,व फवारणी करताना पंप इतर कामासाठी वापरताना दोन ते तीन वेळा साबन किंवा सोडयाने धुवूनच वापरावा, या सूचनांचे  शेतकऱ्यांनी पालन करावे.

       कीटकनाशक वापरण्यापूर्वी  लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे. डब्यावरील  लाल  रंगाचे पतंगीच्या  आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके  सर्वात विषारी त्यानंतर पिवळा ,निळा व हिरवा असा क्रम लागतो. हि चिन्हे सोपी व सर्वसाधारण ,निरक्षर व्यक्तीसाठी समजण्याठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत कमी विषारी असतात.

          तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये.फवारणी करतांना संरक्षक कपडे,बुट,हातमोजे,नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा.बाधित व्यक्तीची घ्यावयाची काळजी. कीटकनाशक पोटात गेल्यास किंवा त्वचा ,डोके, श्वसनेंद्रिया  द्वारे विषबाधा होऊ शकते.व्यक्तीस विषबाधा  झाल्यास झाल्यास अपघात स्थानापासून दूर न्यावे. त्याच्या अंगावरील कपडे सैल करून बदलावे.

          रोग्याचे अंग /बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे. व कोरड्या टॉवेलने पुसावे. कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास बाधित व्यक्तीला ताबडतोब ओकारी करण्याची उपाय योजना करावी.तसेच बधितला पिण्यासाठी बिडी / सिगारेट व तंबाखू देऊ नये.बाधीतला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे व कपडे सैल करावे.

        बधीताला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून द्यावे.श्वासोच्छ्वास योग्य रीतीने सुरु आहे का ते तपासावे.झटके येत असल्यास त्याच्या दातांमध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.बाधित बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणावयाचे प्रयत्न करू नये.बाधीताला काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये.बाधिताला त्वरित कीटकनाशकाच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांकडे  घेऊन जावे. डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करावे.

बाधित व्यक्ती बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

         किटकनाशक विषबाधेपासून रोखण्यासाठी आधुनिक साधने,खाद्य पदार्थ,इतर औषधे व लहान मुले यांच्याशी औषधांचा संपर्क येऊ देऊ नये,फवारणी करताना बिडी व सिगारेट ओढून नये,धुम्रपान करु नये,

औषध मारण्याच्या कामासाठी हातापायावर जखम झालेल्या माणसाची निवड करु नये,डब्यातून अगर बाटलीतून औषध काढताना त्यात नळी घालून तोंडाने वर ओढू नये.फवारणी करताना शेतकरी बंधू, भगिनींनी व फवारणी करणाऱ्या व्यक्तीने वरील सूचनांचे पालन करून फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.