पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अमृत वाटिकेत वृक्षलागवड

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अमृत वाटिकेत वृक्षलागवड

चंद्रपूरदि. 25 : जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायती17 नगरपरिषद/नगरपंचायत व 1 महानगरपालिका अशा एकूण 843 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वसुधा-वंदन अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप म्हणून मेरी माटी मेरा देश’ ‘मिट्टी को नमनविरों का वंदन’ हा उपक्रम मोठ्या उत्साहाने जिल्हाभरात राबविण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व तालुक्यातून माती गोळा केली असून ही माती एकत्रीत करून मातीच्या कलश मधून डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यान येथे आणली गेली. या उद्यानात आलेल्या मातीतून अमृतवाटिका बाग तयार केली जात आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनपोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशीसहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.मनपा आयुक्त विपीन पालीवालताडोबा क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकरप्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंचउपसरपंच आदींची उपस्थिती होती.

अमृत कलश बाईक रॅलीचा शुभारंभ : मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमाच्या समारोपाच्या निमित्ताने जिल्हा परिषद चंद्रपूर येथून बुधवारी (दि.२३) अमृत कलश घेऊन विशेष बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दुचाकी चालवित अमृत कलश रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनउपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडेश्याम वाखर्डेपंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष संपकाळप्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंचउपसरपंचग्रामसेवकजिल्हा परिषदपंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी  सहभागी झाले होते. ही रॅली जटपुरा गेट- बंगाली कॅम्प येथून डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम गार्डनच्या दिशेने मार्गस्थ झाली होती.