राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळास “अ” वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दया

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळास “अ” वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दया

Ø वनेसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आग्रही भूमिका

Ø ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मुंबईत केली सविस्तर चर्चा

मुंबई दि.25 : समाजात राष्ट्रभक्ती जागृत करतअंधश्रद्धा निर्मूलनजातिभेदाच्या निर्मूलनासाठी आणि ग्रामविकासाचे महत्व पटवून देण्यासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करणारे थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील  गुरूकुंज मोझरी येथील समाधी स्थळास “अ ” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळायला हवाअशी आग्रही भूमिका घेत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यासंदर्भात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. महाजन यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कीआत्मसंयमनाचे विचार ग्रामगीतेतून मांडणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1936 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. महाराजांच्या निर्वाणानंतर याच आश्रमातून त्यांचे विचार आजही जगापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अविरत सुरू आहे. गुरुदेव सेवा मंडळाद्वारे संचालित अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरीस्थित गुरुदेव सेवाश्रम ही केवळ वास्तू नसून प्रेरणाकेंद्र आहेऊर्जास्रोत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या समाधी स्थळाला “अ” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी संपूर्ण गुरुदेव भक्तांची व राष्ट्रीय विचारसरणीच्या प्रत्येकाची मागणी आहे.

गुरुकुंज मोझरी येथे दरवर्षी  जगभरातून लाखो भाविक भेट देत देतात. महाराजांच्या विचारांचे सोने सर्वत्र पसरवितात त्यांना व तेथे कार्य  पुढे नेणाऱ्या गुरुदेव सेवा मंडळाच्या पाठीशी शासनाने सर्व बाजूने उभे राहण्याची आवश्यकता आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृतकाळ सध्या सुरू असून याच काळात या प्रेरणास्थळाला “अ” वर्ग तीर्थक्षेत्रासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशी विनंती श्री. मुनगंटीवार यांनी केली.