भंडारा जिल्हा प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणुन नियुक्ती

भंडारा जिल्हा प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणुन नियुक्ती

देशाचे नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा. खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष मा. आमदार जयंत पाटिल साहेब यांनी माझी भंडारा जिल्हा प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणुन नियुक्ती केली आहे.

मा.शरदचंद्र पवार साहेब यांचा आम्हाला मौखिक व निवडणुक आयोगाला लेखी सुचनेप्रमाणे महाराष्ट्रात जे काही पक्षातर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे त्यावर पडदा टाकण्यात आले आहे. मुळ पक्ष हा मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या कडे असुन पुढिल आयोगाच्या निर्णया पर्यंत सर्व आदेश हे प्रांताध्यक्ष मा. जयंत पाटिल साहेब यांचेच असतील असे सांगीतले.
राज्याच्या सोबत व जिल्हयाच्या प्रांताध्यक्षांनी दिलेल्या नियुक्ती व स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिला नविन प्रभारी जिल्हाध्यक्ष यांचेच आदेश पाळावे लागतील. जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीच्या प्रक्रियेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रभारी अध्यक्ष म्हणुन व्हिप चालेल. असा कोणताही व्हिप पक्षाकडुन काढलेला नाही.
अजित पवार गटाचा व्हिप मानायचा प्रश्न येत नाही. हा फक्त दबाव तंत्र असु शकतो. तो मुळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नाही.