पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा

पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा

          भंडारा, दि.20 : सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की,राज्य निवडणुक आयोग,महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. रानिआ/ ग्रापंनि-2022/प्र.क्र.12/ का-8,दि.3.10.2023. च्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांचा पोटनिवडणूकांसाठी  पारंपारीक  पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रमानुसार साकोली तालुक्यातील घानोडा व उमरझरी आतेगाव ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम प्राप्त झालेला असून दिनांक 20 ऑक्टोबर,2023 ते दिनांक 20 ऑक्टोबर,2023 वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजता पर्यत नामनिर्देशनपत्रे मागविण्यात व सादर करण्यात येणार आहत.

        त्याकरिता घानोड व उमरझरी आतेगाव ग्रामपंचायत मधील ज्या कोणत्याही उमेदवारास नागरीकांस अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्ग करीता राखून ठेवलेल्या जागेवर निवडणूक लढवावयाची आहे.अशा उमेदवारांनी तसेच नागरिकांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतचे अर्ज ऑनलाईन भरुन ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आवश्यक त्या दस्ताऐवजासह कागदपत्रे व पुरावा तहसिल कार्यालय, साकोली येथील निवडणुक शाखेत सादर करावे, असे आवाहन तहसिलदार तथा निवडणुक अधिकारी ग्रापनि, साकोली यांनी कळविले आहे.