स्वातंत्र्य दिनी मॉडेल ग्रामपंचायतीचे सरपंच सन्मानित

स्वातंत्र्य दिनी मॉडेल ग्रामपंचायतीचे सरपंच सन्मानित

चंद्रपुर – 17/08/2023   स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) टप्पा – २ अंतर्गत स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्ये सांस्कृतीक व वनमंत्री महाराष्ट्र राज्य ना.सुधीर मुनगंट्टीवार यांचा शुभहस्ते स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कोरपना तालुक्यातील कुकुडसाथचे सरपंच शंकर आत्राम व भद्रावती तालुक्यातील सागरा या गावचे सरपंच शंकर रासेकर यांना नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात हागणदारी मुक्त अधिक ग्राम (ODF+)  करण्याचे काम गावा गावात वेगाने चालु असुन, यामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे केल्या जाते. ही कामे पुर्ण केल्यावर गाव हागणदारी मुक्त अधिक ग्राम (ODF+)  घोषीत केल्या जाते. आता पर्यंत जिल्ह्यातील 600 गावे हागणदारी मुक्त अधिक ग्राम(ODF+)  म्हणुन घोषीत करण्यात आली . उर्वरीत 800 गावे याच आर्थिक वर्षात पुर्ण करण्याचा मानस चंद्रपुर जिल्हापरिषदेचा आहे. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली असुन, जिल्ह्यातील उर्वरीत गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थानाची कामे करण्याचे काम चालु आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ व भद्रावती तालुक्यातील सागरा या गावांनी ग्राम शाश्वत स्वच्छ राहण्यासाठी केलेली कामे राबविलेले उपक्रम यांची दखल घेवुन कुकुडसाथचे सरपंच शंकर आत्राम व सागरा चे सरपंच शंकर रासेकर यांना पालकमंत्री तथा मत्स्ये सांस्कृतीक व वनमंत्री महाराष्ट्र राज्य ना.सुधीर मुनगंट्टीवार यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधीकारी विनय गौडा, चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन , आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.

ग्राम शाश्वत स्वच्छ राखण्याकरीता गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थान होणे गरजेचे असुन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामास प्रथम प्राधान्य देवुन, चंद्रपुर जिल्हातील सर्व गावे हागणदारी मुक्त अधिक ग्राम (ODF+)  करण्याचा प्रयत्न करावा.

– विवेक जॉनसन,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपुर.