अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 18: चांदाफोर्ट, रेल्वे स्टेशन येथे एक अनोळखी पुरुष मृतावस्थेत पडून असल्याची माहिती रेल्वे पोलीसांना मिळाली. अनोळखी  मृत  पुरुषाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर  मृत  इसमाची  ओळख  पटविण्याचे  आवाहन  रेल्वे पोलीस चौकी, नागभीडमार्फत करण्यात येत आहे.

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :

वय अंदाजे 55 वर्ष, उंची 5 फुट 4 इंच, रंग निमगोरा, सडपातळ बांधा, केस काळे-पांढरे लांब, दाढी मिशी पांढरी वाढलेली, चेहरा लांबट, नाक सरळ, डावा डोळा बंद व उजवा डोळा उघडा, दात लालसर, अंगात पिवळया रंगाचा मळलेला हाफ शर्ट, काळया-निळया रंगाचा जर्कींग, पांढऱ्या रंगाचा गमछा या वर्णनावरून सदर  मृतक अनोळखी  व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास तपासी अमंलदार 7066223520 या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच रेल्वे पोलीस चौकी, नागभीड येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.