chandrapur I मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

चंद्रपूर दि.8 जून : कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” राज्यामध्ये राबविण्याकरिता राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांना ग्रीन चैनलद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था (VTI) म्हणून नोंदणी करणे सुरू आहे. 20 बेडपेक्षा अधिक संख्या असलेल्या खाजगी संस्थांचे नोंदणी शुल्क ठरवून देण्यात आलेले आहेत.

यामध्ये, खाजगी रुग्णालयांना व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून एकूण नोंदणी शुल्क रुपये दोन हजार, प्रति व्यवसाय अभ्यासक्रमास लागणारे निरीक्षण शुल्क रुपये 10 हजार तर प्रति व्यवसाय अभ्यासक्रमास लागणारी अनामत रक्कम रुपये 25 हजार भरावे लागणार आहेत.

या बँक खात्यात करा नोंदणी शुल्क जमा:

खाजगी रुग्णालयांनी नोंदणी शुल्क महाराष्ट्र राज्य व्यावसायिक प्रशिक्षण, ॲक्सिस बँक, क्रॉ फोर्ड मार्केट ब्रांच, खाता क्रमांक- 917010078984758 आईएफएससी कोड-UTIB0000294 या बँक खात्यात जमा करावे किंवा ऑनलाइन स्वरूपात, आरटीजीएस, एनईएफटी किंवा आयएमपीएस ने जमा करावे.

रुग्णालयांनी गुगल फॉर्मद्वारे करावी नोंदणी:

https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSeEqG821O5qx7XUd8bNd78aZPtaXNaMmd-RrOypBUYBeZnE-g/viewform?vc=0&c= 0&w=1&flr=0&usp=mail_form_link

येथे साधा संपर्क:

अधिक माहितीसाठी 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत,पहिला माळा हॉल क्रमांक 5/6, चंद्रपूर या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा.