रिल मेकींग स्पर्धेत मिळवा भरघोस बक्षीसे

रिल मेकींग स्पर्धेत मिळवा भरघोस बक्षीसे

            भंडारा दि.11  जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्षातर्फे 17 ते 25 वयोगटातील महाविदयालयीन विदयार्थ्याकरीता रिल मेंकीग स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले आहे.तरी 28 ऑगस्टपर्यत ही रिल dpobhandata@mahasacs या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दिपचंद सोयाम यांनी केले आहे.

        तरुण पिढीमध्ये एडस व एचआयव्ही संदर्भात जनजागृती होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम 5 हजार,व्दितीय 3500 तर तृतीय 2 हजार रूपयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.स्पर्धेचे विषय  routes of transmission ,stigma amd discrimination,benefits og naco aids app or 1097 toll free, Promotion of hiv testing असे असतील.रिल्सचा कालावधी 30 सेंकद ते 1 मिनीटइतकाच असावा.