सोमवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

सोमवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

        भंडारा दि .11 : जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन  येत्या सोमवार 14 ऑगस्ट रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, भंडारा येथे आयोजीत केला आहे.या  महोत्सवामध्ये रानभाजी व पौष्टिक तृणधान्यांपासून बनविलेल्या पाककृतीच्या स्पर्धाचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक आत्मा वर्षा चिखले यांनी दिली.

         मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंद भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामिण तसेच शहरी भागातील नागरीकांना होणेसाठी व विक्री व्यवस्था करुन त्यांचे विक्रीतून शेतकऱ्यांनाही काही आर्थिक फायदा व्हावा या उददेशाने  या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 तरी या रानभाजी महोत्सवास जास्तीत जास्त शेतकरी तसेच नागरीकांनी भेट देण्याचे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा,श्रीमती चिखले  यांनी केले आहे.