आदिवासी विद्यार्थ्यासाठी रविवारी निबंध स्पर्धा आयोजित

आदिवासी विद्यार्थ्यासाठी रविवारी निबंध स्पर्धा आयोजित

उत्कृष्ट तीन निबंधाना आकर्षक पारितोषिक दिले

            भंडारा, दि.11 :जागतिक आदिवासी दिनानिमीत्त येत्या 13 ऑगस्ट  रोजी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी  निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटात विभागली असून पहिला गट इयत्ता 1 ली ते 10 वी, दुसरा गट इयत्ता 10 वी पुढील विद्यार्थी अशा दोन गटात विदयार्थी सहभागी होऊ शकतील.ही निबंध स्पर्धा प्रत्येक तालुकास्तरावरील शाळा –महाविदयालयात  सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान  घेण्यात येणार आहे.

          सहभागी होऊ इच्छीणाऱ्या  विद्यार्थ्यांनी त्यांचे तालुकास्तरावर उपस्थित राहावे,तसेच परिक्षेला येतांना विद्यार्थ्यांनी शाळा व महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असल्याबाबत बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच जातीचा पुरावा सोबत आणावे,व विद्यार्थ्यांनी नमुद परिक्षा केंद्रावर थेट प्रवेश दिल्या जाईल.

          या निबंधस्पर्धेसाठी तालुकानिहाय केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत.- नगर परिषद,गांधी विद्यालय भंडारा, साकोली-नंदलाल पाटील कापगते महाविद्यालय साकोली, तसेच तुमसर-नगर परिषद, नेहरु विद्यालय तुमसर, मोहाडी-जिल्हा परिषद, कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी, लाखनी- जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, पवनी-नगर परिषद, विद्यालय पवनी, लाखांदुर-जिल्हा परिषद, हायस्कुल लाखांदुर असे असतील.

      इयत्ता पहीली ते दहावी इयत्तेसाठी विषय

        महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे थोरपुरुष व क्रांतीवीर यांचे जीवनचरित्र तसेच  दहावी ते पुढील गटासाठी आदिवासी समाजाच्या जडणघडणात आदिवासी युवकांची भुमिका हा विषय आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी सत्र 2023-24 मध्ये भंडारा जिल्हयातील शाळा व महाविद्यालयात प्रवेशीत असावा,तसेच  विद्यार्थी अनुसूचित जमातीचा  असावा.

     स्पर्धेतील दोन्ही गटातील उत्कृष्ट तीन निबंधाना आकर्षक पारितोषिक दिले जाईल.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे निरज मोरे यांनी केले आहे.