सहकारी विभागाची ऑनलाईन परीक्षा 14 व 16 ऑगस्ट रोजी

सहकारी विभागाची ऑनलाईन परीक्षा 14 व 16 ऑगस्ट रोजी

        भंडारा, दि. 10 ऑगस्ट : सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता 6 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिध्दी करण्यात आली होती.त्यानुसार विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी. सी. एस.या कंपनीमार्फत  14 ऑगस्ट 2023  व 16 ऑगस्ट 2023 या रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तरी परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत.

         तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की,वरिल दिलेल्या संकेतस्थळावरुन परीक्षेचे प्रवेशपत्र पाप्त करावे,आणि परीक्षेस येताना त्यांची रंगीत प्रत सोबत ठेवावी,तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,भंडारा या विभागानी कळविण्यात आले आहे.