दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण आयोजिन

दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण आयोजिन

 

        भंडारा, दि. 10 ऑगस्ट : भारत सरकार,महाराष्ट्र शासन एवं बैक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटी संस्थेद्वारे निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे 17 ऑगस्ट 2023  पासून दुचाकी वाहन दुरुस्ती चे तिस दिवसीय प्रशिक्षण सुरु होत आहे.

         तरी या प्रशिक्षणामध्ये टयुबलेस टायर पंचर,ऑईलचे प्रकार,इंजीन दुरुस्ती,क्लचप्लेट दुरुस्ती,गेटरलेस दुचाकी वाहन दुरुस्ती,बॅटरी चेक व रिचार्ज, ब्रेकड्रम, शॉकप रिपेरींगची कामे व कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तीमत्व विकास,प्रकल्प अहवाल,व्यवसायची संधी,बाजार सर्वेक्षण,बैकेच्या योजना या बद्दल मार्गदर्शन दिले जाईल.प्रशिक्षण प्रवेशाकरिता आयोजित मुलाखतीकरिता येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड, जॉब कार्ड, सोबत आणणे आवश्यक आहे.

         तरी प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवन,चहा,नाश्ता,राहणे आदीची सोय या संस्थे कडून सोय केली जाईल.तसेच स्वयरोजगारांची आवड,व्यवसाय करण्याची तयारी असणारे उमेवारांचे वय 18 ते 45 वयोगटातील व शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा बेरोजगार पुरुष आणि महिलांनी मुलाखतीकरिता 17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा वाजता बि.ओ.आई.स्टार स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था,आरसेटी बिल्डींग,लालबहादुर शास्त्री मनसे शाळेच्या बाजूला शास्त्री चौक,येथे उपस्थित राहावी.असे आवाहन स्टार स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा या संस्थेनी कळविण्यात आले आहे.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी,व या कार्यालयाचे क्र.9511875908 व 8669028433 या नबंर वर संपर्क साधावे,