पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा संपन्न

शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत

पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा संपन्न

 

भंडारा, दि. 23 : “शासन आपल्या दारी” या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाअंतर्गत महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन महिला रोजगार मेळावा 22 जुन 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपन्न झाला. मेळाव्याकरिता जिल्हयातील 96 उमेदवारांनी ऑफलाईन नोंदणी व 69 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी यावेळी केली.

 

या रोजगार मेळाव्याचे प्रमूख पाहूणे म्हणून विभाग प्रमुख, मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय, शहापूर शाहिद शेख हे होते. तसेच सहायक आयुक्त सुधाकर झळके, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाऊराव निंबार्ते, एलआयसी क्वीस कॉर्प पुणेचे योगेश काबरा, सनसुर र्सुशी इंडीया प्रा. लि. चे सिमा राहांगडाले, सेवा नर्सींग होमचे शाहीद शेख, दिव्या हेल्थकेअर चे इंद्रजीत मानकर, न्यु इरा मोटर्स भंडाराचे आनंद भोयर उपस्थित होते.

 

सुधाकर झळके यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये युवतींनी मोठया प्रमाणात असलेल्या खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी प्राप्त करून रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी प्राप्त करावी असे आवाहन केले. शहीद शेख यांनी महिलांसाठी असलेल्या विशेष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या करीअरचे पुढचे पाऊल गाठावे असे आवाहन केले. तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य बाबत मार्गदर्शन जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं सुहास बोंदरे यांनी केले.

 

मेळाव्यामध्ये खाजगी कंपन्या तसेच जिल्ह्यातील आस्थापना यांचेमार्फत एकूण 85 रिक्तपदे महिलांकरीता अधिसुचित करण्यात आली होती. मेळाव्यामध्ये जिल्हयातील 96 महिला उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित होत्या.