जिल्हा परिषद गडचिरोली येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

जिल्हा परिषद गडचिरोली येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

गडचिरोली, दि.19: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली अंतर्गत अधिनियम 2005 चे कलम अन्वये उपरोक्त शासनाचे निर्देशाप्रमाणे नैसर्गिक आपत्ती जसे पूर,वज्रघात,पुल कोसळणे,साथरोग,चक्रीवादळ,भुकंप,अपघात कोरोना साथरोग तसेच प्राथमिक शाळा,ग्रामपंचायती इमारती पडझड इत्यादीवर नियंत्रण ठेवून तात्काळ उचित उपाययोजना करण्याकरीता जिल्हा परिषद गडचिरोली,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

सदर नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित राहावे. व आरोग्य विभागाचे दुरध्वनी क्रमांक 01732-222317 यावर संपर्क करुन माहिती घावी. नियुक्त संबधीत कर्मचाऱ्यांनी आपातकालीन परिस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, संबधित विभागाचे विभाग प्रमुख व नियंत्रण अधिकारी यांचेशी संपर्क साधुन आपातकालीन परिस्थितीची माहिती तात्काळ अवगत करावी. असे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,गडचिरोली यांनी कळविले आहे.