भंडारा पोलीस दलातर्फे मिनी मॅराथॉन स्पर्धा संपन्न

भंडारा पोलीस दलातर्फे मिनी मॅराथॉन स्पर्धा संपन्न

भंडारा :- मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे निर्देशान्वये सदर फिट राईझ ७५ फिटनेस प्रोग्राम फ्लॅग ऑफ Flag off ceremony त्या अनुषंगाने दिनांक २७/ १० / २०२३ रोजी ०८.३० वा. पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड येथे मा. पोलीस अधिक्षक श्री. लोहित मतानी यांचे अध्यक्षतेखाली पोलीस दलातर्फे येथे मिनी मॅराथॉन ५ कि.मी. स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व पोलीस कुंटुबीय, पोलीस भरती देणारे अॅकॅडमी येथील सर्व पुरुष व महिला असे एकुण ३५० स्पर्धेकांनी भाग घेतला होता. सर्व स्पर्धकांना स्पर्धेचा मार्ग व नियमांशी अवगत केले. मॅराथॉन मार्ग पोलीस मुख्यालय, भंडारा येथुन सुरुवात होवुन चैतन्य ग्राउड रोड गणेशपुर येथुन पिंकेपार येथुन पोलीस मुख्यालय परत असा मार्ग होता. सकाळी. ०८.३० वा. मा. पोलीस अधिक्षक श्री. लोहीत मतानी यांनी हिरवी झेंढी दाखवुन स्पर्धेकरीता मार्गस्थ केले. त्यानंतर पाच किलोमीटर दौड़ पुर्ण करण्याच्या ईरादयाने व स्पर्धकांचे मनोबल उंचावण्याकरीता पोलीस अधिक्षक श्री. लोहीत मतानी यांनी सुध्दा स्पर्धेमध्ये उत्फुर्तपणे सहभाग घेवुन दौड पुर्ण केली. प्रथम, व्दितीय, तृतीय तसेच कार्यक्रमात सहभाग घेणा-यांना पोलीस अधिक्षक श्री. लोहीत मतानी यांनी मॅडल देवुन सर्वाचे कौतुक केले.

यावेळी जिल्हा किडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा डॉ. अशोक बागुल, पोलीस उपअधिक्षक (गृह) भंडारा श्री. सचिन पवार, पोलीस निरीक्षक श्री. जितेन्द्र बोरकर जिवीशा भंडारा, पोलीस निरीक्षक भंडारा श्री. सुर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत पाटील, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय भंडारा श्री. रघुनाथ चौधरी, प्रशिक्षक पोलीस विभाग यांनी अथक प्रयत्न करुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. सहायक पोलीस निरीक्षक श्री. मट्टामी दोषसध्दी कक्ष भंडारा संचालन करुन कार्यक्रमाची सांगता केली.