राज्यातील उत्कृठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत

राज्यातील उत्कृठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत

गडचिरोली, दि.03:महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग, शासन निर्णय दिनांक 19 सप्टेंबर 23 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचे व त्यासाठी निवड करण्याची कार्यपद्धत शासन निर्णयान्वये निश्चित केलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली असुन विजेत्यांची निवड करण्यासाठी पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती राहिल. 1. निवासी उपजिल्हाधिकारी, गडचिरोली- अध्यक्ष, 2. शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक-सदस्य, 3.महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी-सदस्य, 4. जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गडचिरोली-सदस्य, 5. पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, गडचिरोली- सदस्य, 6. जिल्हा नियोजन अधिकारी, गडचिरोली- सदस्य सचिव.
शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यासंदर्भातील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. शासन निर्णयातील बाबींची पुर्तता करणाऱ्या/ करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शासन निर्णयातील विहित नमुन्यात अर्ज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दिनांक 10.07.2023 ते 05.09.2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत., प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांनी प्राप्त झालेले जिल्हा निहाय अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास दिनांक 08.09.2023 पूर्वी उपलब्ध करुन द्यावेत. याकरीता सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती यांनी स्वतंत्र ईमेल आयडी तयार करुन प्रकल्प संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांना त्यांच्या ईमेलवर दिनांक 15.08.2023 पुर्वी कळवावे., सदर‍ निवड समितीने शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी. शिफारस केलेल्या गणेशोत्सव मंडळाचे नाव दिनांक 01.10.2023 पर्यत राज्यस्तरीय समितीकडे प्रकल्प संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई यांना त्यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर पाठवावीत., गडचिरोली जिल्ह्यातील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पुरस्कारासाठी निवड करतांना शासन निर्णय दिनांक 04 जुलै 2023 मधे दिलेल्या निर्देशाप्रमाणे व निकषांच्या आधारे निवड करावे व त्यासंबंधात अनुषंगीक जबाबदारी पार पाडावी.
सदर स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे याकरीता आवाहन करण्यात यावे. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.