महात्मा ज्योतिबा फुले संशोधक व प्रशिक्षण संस्था यांची विद्यार्थ्यांना घेऊन उदासीनता -अभाविप

महात्मा ज्योतिबा फुले संशोधक व प्रशिक्षण संस्था यांची विद्यार्थ्यांना घेऊन उदासीनता -अभाविप

(महाज्योती) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत  इतर मागास वर्गाच्या (OBC) विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक  योजना राबविल्या जातात. ३० जुलै रोजी संस्थेकडून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग क्लासेस पुरविण्याच्या संदर्भात निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रातील विविध सेंटर वर जाऊन विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, मात्र यामध्ये अजब प्रकार उघडकीस आला. पुण्यातील ज्ञानदीप या खाजगी क्लासेसच्या टेस्ट सिरीज मधील प्रश्न जसेच्या तसे या परीक्षेत विचारण्यात आले. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी फक्त ज्ञानदीपचे क्लास लावून या योजनेचा लाभ घ्यावा असे सरकारला म्हणायचे आहे काय ? विद्यार्थ्यांना अधिकारी घडवण्यासाठी शासन स्तरावर कोट्यावधी रुपये खर्च होतात पण ते खाजगी क्लासेसच्या घशात घालण्याचे काम आत्ताचे अधिकारी करत आहेत. यापूर्वी घेण्यात आलेल्या यूपीएससी निवड परीक्षेत मास कॉपी झाल्यामुळे परीक्षा पेपर रद्द करण्याची नामुष्की संस्थेवर आली होती. वारंवार या घटना होत असताना संबंधित मंत्री याकडे दुर्लक्ष का करत आहेत ? या सर्व घटनेमुळे महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थी दुखावला जात आहे ? या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, दोषी अधिकाऱ्याची हकालपट्टी व्हावी, महाज्योती कडून स्वतंत्रपणे परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी यंत्रणा सुरू करावी, पुढील पंधरा दिवसात पुन्हा परीक्षा घेऊन निकाल लावण्यात यावे, पात्र विद्यार्थ्यांना पुण्यातील वेगवेगळे क्लास निवडीची संधी देण्यात यावी, या सर्व मागण्या सरकारने तत्काळ पूर्ण कराव्या व या सर्व भोंगळ कारभारावर आळा घालावा. अन्यथा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा आक्रोश राज्य सरकारला सहन करायला लागेल. असे मत विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम यांनी व्यक्त केले.

मागण्या पुढील प्रमाणे-

१) या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी व दोषी अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी.

२) महाज्योती कडून स्वतंत्रपणे निवड चाचणी प्रक्रिया राबवण्यासाठी यंत्रणा सुरू करावी.

३) पुढील पंधरा दिवसात पुन्हा परीक्षा घेऊन निकाल लावण्यात यावे .

४) पात्र विद्यार्थ्यांना पुण्यातील वेगवेगळे क्लास निवडीची संधी देण्यात यावी. (सारथी प्रमाणे)