चंद्रपूर शहर महानगरपालिकेत संविधान प्रस्तावनेचे वाचन

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत संविधान प्रस्तावनेचे वाचन

चंद्रपूर, ता. 26 : शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.

यावेळी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी संविधान प्रस्तावना वाचन केले. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, महिला व बालकल्याण सभापती पुष्पाताई उराडे, माजी महापौर अंजली घोटेकर, यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.