वेलगुर मा. मा. तलाव, 100 टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

वेलगुर मा. मा. तलाव, 100 टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

गडचिरोली, दि.28:वेलगुर मा.मा. तलाव, मु .पो.- वेलगुर, तालुका- अहेरी, जिल्हा- गडचिरोली दिनांक 28/07/2022 ला सकाळी 10.00 वा. 100 टक्के भरलेला आहे. तरी तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरीकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा देण्याची विनंती करण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी कळविले आहे.