कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत
जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत.

गडचिरोली, दि.28:कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील दारीद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 टक्के अनूदानावर उपलब्ध करून द्यावयाची आहे. सदर जमीन शासनाने लाभार्थ्यांना खरेदी करून द्यावयाची आहे.
त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे त्यांनी विकत असलेल्या जमीनीचा 7/12, जमिनीचा नकाशा, धारण करीत असलेल्या जमीनीचा तपशील (नमुना 8-अ) ,जमीन मोजणी “क” प्रत, गाव नकाशा, रु. 100 च्या स्टँम्प पेपरवर शपथपत्र इत्यादी माहिती सह जमीन विक्रीबाबतचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा.
शासन निर्णय दिनांक:- 14 ऑगस्ट 2018 नूसार जमीन खरेदीबाबतची कार्यवाही करण्यात येईल. अधिकच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.