मणिपूर घटनेचा सिंदेवाही काँग्रेस तर्फे निषेध…

मणिपूर घटनेचा सिंदेवाही काँग्रेस तर्फे निषेध…

ईशान्य भारतातील मणिपूर या राज्यात मागील तीन महिन्या पासून आदिम जमातीतील “मैतेइ आणि कुकी” या दोन समुदाय मध्ये उसळलेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिनांक 04 में 2023 रोजी तेथील महिला भागिनिंची नग्न धिंड काढून त्यांचेवर पाशवी अत्याचार करण्यात आल्याची चित्रफीत दिनांक 18 जुलाई रोजी संपूर्ण भारत भर समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
संपूर्ण देशभरात या घृणास्पद कृत्याचे घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र आंदोलन सुरू असून आज दिनांक 25/07/2023 रोज मंगळवारला सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री रामाकांतजी लोधे, अध्यक्ष कृ. बा. स यांच्या अध्यक्षतेखाली सह महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ सीमाताई विनोद सहारे यांच्या नेतृत्वात शहर कांग्रेस कमेटी, शहर महिला कांग्रेस कमेटी आणि इतर फ्रंटल आर्गनाजेशन च्यासंयुक्त विद्यमाने मणिपूर घटनेचा निषेधार्थ सन्मानिय श्री, शिंदे साहेब तहसीलदार सिंदेवाही यांच्या मार्फत देशाच्या महामहीम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले.

मणिपूर येथील घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. याच घटनेचा “जाहिर निषेध” अतिशय तीव्र शब्दात संताप व्यक्त करीत, घोषणाबाजी करीत भावनीक जाहिर निषेध नोंदविन्यात आले.!
*यावेळी तहसीलदार साहेबांच्या अनुपस्थितित माननीय धात्रक साहेब यानी निवेदनाचा स्वीकार करीत “उपरोक्त निवेदनाची तात्काळ नोंद घेवून त्वरित “महामहिम राष्ट्रपति महोदया कड़े रवाना करण्यात येईल आणि तसे माहितीसत्व आपणास कळविन्यात येईल ऐसे आश्वासन दिले*
याप्रसंगी प्रामुख्याने माननीय रमाकांतजी लोधे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, सौ सीमाताई सहारे अध्यक्ष तालुका महिला काँग्रेस कमिटी, सौ निमत्रिता कोकोडे उपाध्यक्ष महिला कांग्रेस, सौ प्रीती सागरे अध्यक्ष शहर कांग्रेस कमेटी सिंदेवाहि, स्वप्निल कावळे नगराध्यक्ष न.प. सिंदेवाहि-लोनवाहि ,उपनगराध्यक्ष मयूर सूचक, माजी नगराध्यक्ष सौ आशा गंडाटे, शहराध्यक्ष प्रीती सागरे, नगरसेवक युनूस शेख, अमृत मडावी, श्रीमती मीनाक्षी मेश्राम नागरसेवीका,सौ पूजा विलास रामटेके, सौ श्वेता मोहूर्ले, सौ वैशाली पुपरेड्डीवार, सौ अंजू भैसारे, सौ नीता रणदिवे, सौ अस्मिता जुमनाके, कृ.उ.बा. संचालक नरेंद्र भैसारे, संजय पुपरेड्डीवार, संचालिका जयश्रिताई नागापुरे (कावळे) युवक कांग्रेस कार्यकर्ते अभिजीत मुपिडवार, ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी अभिमन्यू गेडाम, अवीनांश नागदेवते, सह श्रीमती पुष्पा शिडाम अध्यक्ष महिला अनुसूचित जाती विभाग, सौ संगीता दीपक शंखपाल, सौ ठवकर मैडम, विशाखा उंदीरवाडे, कल्पना मरसकोल्हे ,गीता सलामे, मोरेश्वर ज्ञानवाडकर कार्यालयीन प्रसिद्धि प्रमुख, अशोकजी सहारे कार्यालयीन सहायक, सह इत्यादि पुरुष महिला यावेळी प्रामुख्याने बहुसंख्येने उपस्थित होते.