30 एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा Ø प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आवश्यक Ø स्वाक्षरी नसल्यास प्रतिज्ञापत्र भरुन देणे अनिवार्य

30 एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा

Ø प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आवश्यक

Ø स्वाक्षरी नसल्यास प्रतिज्ञापत्र भरुन देणे अनिवार्य

चंद्रपूर, दि. 21 एप्रिल :  जवाहर  नवोदय  विद्यालय, तळोधी (बा.) द्वारा वर्ग 6 वी, सन 2022-23 सत्राकरीता 30 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरलेले आहे, अशा विद्यार्थ्यांनी  https://cbseitms.nic.in या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत व डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. प्रवेश पत्रावर स्वाक्षरी नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्याला प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल. त्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला बसता येणार नाही.

प्रतिज्ञापत्राचा नमुना परिक्षाकेंद्रावर उपलब्ध राहील. परीक्षा झाल्यानंतर सदर प्रवेशपत्र परीक्षा केंद्रात जमा करावे लागेल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा.)च्या प्राचार्या मीना मणी यांनी कळविले आहे.