आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे ग्रँड फॉर्च्यून इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनी मध्ये गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन 2,36,60,000/-रुपये ची फसवणूक केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे ग्रँड फॉर्च्यून इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनी मध्ये गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन 2,36,60,000/-रुपये ची फसवणूक केली आहे.

फिर्यादी नामे रेवनात आनंदराव एकरे वय 46 वर्ष, राहणार गडचांदूर यांचे रिपोर्ट वरून पो. स्टे. रामनगर अप. क्रमांक 117/2022 कलम- 420, 465,468, 406,34 भा. द. वि. सहकलम 3,4 एमपीआयडी ऍक्ट सन 1999 मधील ग्रँड फॉर्च्यून इन्फ्रा अँड डेव्हलपर्स ही कंपनी उघडून वेगवेगळ्या स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून मुदतपूर्ण झाल्यानंतरसुद्धा गुंतवणूकदारांना पैसे परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्यामुळे आरोपी १) टेकूला मुक्तीराज रेड्डी २) भालचंद्र गणेश वडस्कर ३) अंजना रमय्या बेलम ४) मोतीलाल सरकार ५) अमोल गणेश महाजन यांनी ग्रैंड फॉर्च्यून इन्फ्रा अँड डेव्हलपर्स कंपनीमध्ये गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन 2,36,60,000/-रुपयाची फसवणूक केलेली आहे. याबाबत त्यांचे विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहे.

सदर ग्रँड फॉर्च्यून इन्फ्रा अँड डेव्हलपर्स कंपनीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या स्कीम मध्ये व योजनेमध्ये रकमेची गुंतवणूक केलेली आहे. परंतु सदर कंपनीकडून गुंतवणूकदाराची रक्कम परत केलेली नाही. अशा गुंतवणूकदारांच्या याद्या तयार करणे सुरू आहेत. तरी ज्या गुंतवणूकदाराची रक्कम परत मिळाली नाही अशा गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे कागदपत्र रक्कम जमा केल्याच्या पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड व ज्या खात्यात पैसे पाहिजे आहेत त्या बँक खात्याचे पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स व ग्रँड फॉर्च्यून इन्फ्रा अँड डेव्हलपर्स कंपनीचे स्कीम मधून खात्यावर जमा झालेले पैशाचे बँक स्टेटमेंट इत्यादी माहितीसह परिशिष्ट – १ प्रमाणे फार्म भरून देणे करिता आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर पो.स्टे. दुर्गापुर परिसर कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे त्वरित यावे याकरिता अशी बातमी सर्व वर्तमान व सोशल मीडियावर प्रसारित करण्यात यावी.