जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासून द्यावे

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासून द्यावे
प्रहार शिक्षक संघटनेचे तालुका वैद्यकिय अधिकार्यांना निवेदन.

सिंदेवाही प्रतिनिधी :-
जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती यू डायस प्रणाली मध्ये भरण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत त्यामधे विद्यार्थ्याच्या रक्त गटाची माहिती भरायची आहे.
सर्व विद्यार्थ्यांना रक्तगट तपासणी करिता दवाखान्यात आणणे शक्य नाही करिता तालुका आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला सूचना देवून शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी मोहीम राबवावी करिता प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल सुने यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ रंगारी, सरचिटनीस विनोद गेडाम, जिल्हा महिलाध्यक्ष राजश्री वसाके, जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश बन्सोड,तालुका पदाधिकारी वनिता ठाकरे, नीलिमा बनसोड ऊपस्तिथ होते.