एदेन्स बचत निधी लिमिटेड मधील आर्थिक फसवणुकीचे गुन्ह्यामध्ये जनतेस जाहीर आव्हान.

आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी एदेन्स बचत निधी लिमिटेड मधील आर्थिक फसवणुकीचे गुन्ह्यामध्ये जनतेस जाहीर आव्हान.

पोलीस स्टेशन, रामनगर, जिल्हा चंद्रपूर येथे फिर्यादी यांचे लेखी तक्रारीवरून सन 2019 मध्ये एन्स बचत निधी लिमिटेड, चंद्रपूर मधील संचालक सदस्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने व त्याच्या वडिलांच्या नावाने गुंतवणूक जमा केली असून त्या गुंतवणुकीवर एदेन्स बचत निधी यांनी दोन टक्के व्याज दर महिन्याला देण्याचे ठरले अशा प्रकारे अनेक गुंतवणूक दारांच्या ठेवीची मुळ रक्कम व व्याज परत केले नाही. अशा फिर्यादीचे लेखी तक्रारीवरून अपराध क्रमांक 409/2023 कलम 42040640934 भा.द.वि. सह कलम 3 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापना मधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 अन्वये गुन्हा नोंद असून आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.

तरी सदर प्रकरणात एन्स बचत निधी प्रायव्हेट लिमिटेड, चंद्रपूर मध्ये ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे त्या गुंतवणूकदारांनी त्यांनी त्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक व गुंतवणुकी संबंधाने त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे घेऊन विना विलंब आर्थिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे (दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या आवारात) आणून सादर करावीत व पुरावा कागदपत्रे जमा करावीत.