सिंदेवाही येथे वाल्मिकी जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सिंदेवाही येथे वाल्मिकी जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सिंदेवाही वाल्मिकी समीती सिंदेवाही तर्फे नुकतेच वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली यामध्ये पहिल्या दिवशी मुकरुजी मारबते यांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली, दुपारी महिलांचा हळदी कूंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला व रात्री गुरुदेव भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी वाल्मिकी ऋषीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले शाळेचे श्री प्रदिप सहारे हे होते. कार्यक्रमाचे उदघाटन प्रा डॉ राजेश डहारे सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही यांनी केले , या कार्यक्रमाला अरविंद जयस्वाल, माजी पंचायत समिती सभापती, पांडुरंग गेडाम अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मच्छिमार संघ, मयुर सुचक उपाध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही, मिनाक्षी मेश्राम, शाम छत्रवानी सदस्य नगरपंचायत सिंदेवाही, जयश्री कावळे, तुळशीदास गेडाम, हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम भोयर यांनी केले. या कार्यक्रमात सुमीत्राबाई सहारे यांनी स्वागत गीत सादर केले. पंचशील मत्स्य सोसायटी सिंदेवाही तर्फे आकस्मिक मृत्यू झालेल्या शंकर मेश्राम यांच्या पत्नीला पाच हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. सोसायटी ने साठ वर्षावरील सभासदांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. पांडुरंग गेडाम चंद्रपूर यांनी डॉ राजेश डहारे व मिनाक्षी मेश्राम यांचा त्यांच्या कार्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. शेवटी बावने महाराज यांचे कीर्तन व दहीकाल्याचा कार्यक्रम घेण्यात आला व भोजनाचे कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव चाफले, विनोद मेश्राम, सुमीत्राबाई सहारे, जगदीश मेश्राम, विनोद सोनकर, बाळु गेडाम, वनिता डोंगरवार, राजु मेश्राम, सुमनबाई भोयर, बंडूजी मेश्राम व इतरांनी सहकार्य केले