उत्पादक कंपन्यांनी नोंदणी प्रक्रिये करीता अर्ज करावे

संरक्षित शेती या घटकाकरीता साहित्याचे उत्पादन व पुरवठा करण्याच्या

उत्पादक कंपन्यांनी नोंदणी प्रक्रिये करीता अर्ज करावे

गडचिरोली, दि.19: महाराष्ट्र राज्य शासनामार्फत संरक्षित शेती तंत्रज्ञानास कृषि विभागाच्या विविध योजनेच्या

माध्यमातुन शेतक-यांना अर्थ सहाय्य देऊन प्रोत्साहन दिले जाते. संरक्षित शेती घटकांर्गत हरितगृह/शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर, डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेल नेट या घटकाचा समावेश आहे. कृषि विभागाच्या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्याना चांगल्या दर्जाचे साहित्य पुरवठा होणे. साहित्याची गॅंरटी, वॉटर व दुरुस्ती याबाबत हमी मिळणेस. याअनुषंगाने पाँलीफिल्म, टेपनेट, मोनोनेट, इन्सेक्ट नेट, अँप्रॉन पेपर, प्लास्टिक आच्छादन, जीआय पाईप, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर या साहित्याचे उत्पादन व पुरवठा करण्या-या उत्पादक कंपन्यांची नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ यांचे मार्फत राबविणे प्रस्तावित आहे. सदर नोंदणी प्रक्रिया राबविण्याकरिता अटी व शर्तीच्या अधीन राहून उत्पादक कंपन्याचे नोंदणी करीताचे प्रस्ताव दि.१४-०८-२०२३ पर्यत मागविण्यात येत आहेत. उत्पादन कंपन्यांच्या नोंदणी प्रक्रियेबाबतची अटी, शर्ती व तर तपशील कृषि विभागाच्या www.mahanhm.in व www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने असे आवाहन करण्यात येते की, संरक्षित शेती या घटकाकरीता साहित्याचे उत्पादन व पुरवठा करण्याच्या उत्पादक कंपन्यांनी सदर नोंदणी प्रक्रियेकरीता अर्ज करावे असे बसवराज भि. मास्तोळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.