अचूक मतदार यादी करण्यास प्राधान्य- जिल्हाधिकारी

अचूक मतदार यादी करण्यास प्राधान्य- जिल्हाधिकारी

· विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 

भंडारा, दि. 10: छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच मतदार यादी अचूक करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच उपविभागीय अधिकारी यांची बैठक घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. तसेच त्यांनी नोंदविलेल्या आक्षेपाबाबत आयोगास कळविण्यात येईल असे सांगितले. सभापती शिक्षण व आरोग्य रमेश पारधी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेश पाटील, तीनही उपविभागीय अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनीधीमध्ये नरेश डाहारे, नितीन वानखेडे, महेंद्र निंबार्ते, स्वप्नील भोंगाडे, मोहन पंचभाई, भानूदास बनकर, शंकर राऊत यावेळी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जून ते 16 आक्टोबर 2023 पर्यंत पुनरीक्षण पूर्व कार्यक्रम निर्धारित करण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदार यादी व 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावयाची आहे. 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. नागरिकांना https://www.nvsp.in अथवा https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येणार आहे. तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफलाईन दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.

एकूण मतदार संख्या व मतदान केंद्र बाबत माहिती