सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना”

सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना”

गडचिरोली, दि.08:प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कमराज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ 1/- रुपया भरून PMFBY पोर्टलhttps://pmfby.gov.inवर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनीप्रतिनिधी वसामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिकसेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. ४०/- देण्यात येते.परंतु राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून शेतक-यांकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

त्या अनुषंगाने सर्व शेतक-यांस आवाहन करण्यात येते की, सामुहिकसेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ रु.१/- रुपया भरुन पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी व CSC ने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय,तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी यांचेशी संपर्क साधावा.