“क” वर्ग मत्स्यपालन/दुग्ध सहकारी संस्थाच्या व्यवस्थापन समितीचा  सन 2022-23 ते 2027-28 चा निवडणूक कार्यक्रम

“क” वर्ग मत्स्यपालन/दुग्ध सहकारी संस्थाच्या व्यवस्थापन समितीचा 

सन 2022-23 ते 2027-28 चा निवडणूक कार्यक्रम

 

गडचिरोली, दि.15:सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 13 फेब्रुवारी 2023 व दि.10 फेब्रुवारी 2023 चे आदेशान्वये दि.वाल्मीकी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या.गडचिरोली र.नं.2053 ता.जि. गडचिरोली व जयलक्ष्मी दुध उत्पादक सहकारी संस्था मर्या. ठाणेगाव र.नं.304 ता. आरमोरी जि.गडचिरोली, मत्स्य /दुग्ध सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मंजुर करण्यात आला असुन सदरहू संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहिर करण्यात येत आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करणे व स्विकारणे दि. 27 फेब्रुवारी 2023 ते 06 मार्च 2023, नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे दि.07 मार्च 2023, विधीग्राहय नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे दि.08 मार्च 2023, उमेदवारानी नामनिर्देशन पत्र मागे घेणे. दि.09 मार्च 2023 ते 23 मार्च 2023, उमेदवारांना बोधचिन्ह वाटप करणे व बोधचिन्हासहित अंतिम यादी प्रसिद्ध करणे. दि.24 मार्च 2023, आवश्यक असल्यास मतदान घेणे/ मतमोजनी व निकाल जाहिर करणे. दि.26 मार्च 2023.

वरील निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी मत्स्यपालन तथा दुग्ध सहकारी संस्थाचे नोटीस बोर्डवर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), गडचिरोलीचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केलेला आहे. तरी उपरोक्त दोन्ही सहकारी संस्थांचे सर्व सभासदांनी निवडणूक कार्यक्रमाची नोंद घ्यावी. असे तासनिअ तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), गडचिरोली यांनी कळविले आहे.