अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 07 : श्रीराम मार्केट लक्की साडी सेंटर जवळ बिनबा रो येथे एक अनोळखी पुरुष वय अदांजे 55 वर्ष असून मृत अवस्थेत आढळून आला आहे. सदर अनोळखी मृत पुरुषाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता तसेच मंदीर परीसरात, रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, शहर परीसरात विचारपुस केली असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन चंद्रपूर, शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

 

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :

 

वय अंदाजे 55 वर्ष, केस काळे-पांढरे,दाढीमिशी पाढंरी, अंगात निळया पांढऱ्या रेषा असलेला फुल शर्ट, व

 

काळ्या रंगाचा फुलपॅन्ट परिधान केलेला आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.